Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी १४ अर्ज छाननीत अवैध

गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये छाननीत सरपंच पदासाठीचे तीन अर्ज तर सदस्य पदासाठीचे १४ अर्ज अवैध ठरवण्यात आले. सरपंच पदासाठी १८८ तर सदस्य पदासाठी १०५७ अर्ज शिल्लक आहेत. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली छाननीची प्रक्रिया पार पडली.

३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठी एकूण १९१ तर सदस्य पदासाठी १०७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये येणेचवंडी , कुंबळहाळ, हडलगे येथील सरपंच पदासाठीचे प्रत्येकी एक असे तीन अर्ज अवैद्य ठरले. तर सदस्य पदासाठी  महागाव ३, डोणेवाडी १, बेकनाळ १, भडगाव ३, कडगाव १, करंबळी १, मुगळी २, सांबरे १, बड्याचीवाडी १  असे १४ अर्ज अवैध ठरले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.