Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड येथे बालविवाह बाबत जनजागृती


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नौकुड (तालुका गडहिंग्लज) येथे बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे याविषयी जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मराठी शाळा व अंगणवाडीतील चिमुकल्यानी हातात फलक घेऊन बालविवाह बाबत केलेल्या जनजागृतीचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.

 बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा 

यावेळी मराठी शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीद्वारे बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मुलींचे वय 18 व मुलांचे वय 21 पूर्वी लग्न करणे हा गुन्हा आहे. याबाबत प्रबोधन करण्यात आले. घोषणांचे फलक तयार करून जनजागृती करण्यात आली.

यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, उपसरपंच सौ. रेखा सरदेसाई, ग्रामसेवक विजय जाधव, पोलीस पाटील संजय पाटील, मुख्याध्यापक श्री.मगदूम, अंगणवाडी सेविका सौ. मंगल मांगले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.