गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाचा एम.ए मराठी भाग एक मधील संकेत कृष्णात पाटील या विद्यार्थ्याने क्रांती अग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड महाविद्यालय कुंडल (तालुका पलूस) यांच्यावतीने आयोजित क्रांती अग्रणी राज्यस्तरीय विविध वक्तृत्व स्पर्धेत तृतीय, रसिक वाचनालय घुणकी (तालुका हातकणंगले) आयोजित ग्रंथसप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात तृतीय तसेच शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड (जिल्हा औरंगाबाद) यांच्यावतीने सहकार महर्षी बाळासाहेब पवार राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रा. कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर मराठी विभाग प्रमुख डॉ. मनमोहन राजे, प्रा.अशोक मोरमारे, डॉ.आनंदा कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

