कडलगे, बटकणंगले ग्रामपंचायती बिनविरोध
महागाव, बड्याचीवाडीत थेट सरपंच पदासाठी विक्रमी अर्ज
कडाल येथे सरपंच पदासाठी एकमेव अर्ज
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १९२ तर सदस्य पदासाठी १०७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तालुक्यातील कडलगे व बटकणंगले ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी या ३४ गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एम.आर हायस्कूलच्या मैदानावर ही प्रक्रिया पार पडली. दरम्यान, थेेेट सरपंच पदासाठी महागाव येथे १० तर बड्याचीवाडी येथे विक्रमी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कडाल येथून सरपंच पदासाठी एकमेेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
ग्रामपंचायत निहाय सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी दाखल अर्ज पुढील प्रमाणे : महागाव १०- ८७, तावरेवाडी ४- १६, हिटणी ४- ३२, हरळी खुर्द १४- ५५, येणेचवंडी ४-२४, सरोळी ३-१८, काळामवाडी ६- १९, वैरागवाडी ६-१४, डोणेवाडी २-११, हिडदुग्गी ४-१७, हडलगे ९- ३२, बिद्रेवाडी ४-१८, कडाल १-१४, कळविकट्टे ४- २५, जखेवाडी ३-१८, तारेवाडी ५- २०, कुंबळहाळ ५-१६, यमेहट्टी ५- २१, बटकणंगले १-९, कौलगे २- २८, कुमरी ६-२८, बेकनाळ ४- २६, भडगाव ११-१०४, कडगाव १०-७९, करंबळी १०-४८, मुगळी ८-३९, खमलेहट्टी २-२१, शिप्पुर तर्फ नेसरी ५-२८, नेसरी ७-५८, हसुरसासगिरी ४-८, सांबरे ७-३४, कडलगे १-९ , बड्याचीवाडी १६- ६०, हसुरवाडी ५-३५.
