Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात नववर्षाच्या स्वागताचे प्रबोधन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नववर्षाचे स्वागत चांगल्या गोष्टीतून,चांगल्या संकल्पनेतून आपण सर्वांनी करावे. या स्वागताला प्रबोधनाची झालर प्राप्त होणे आवश्यक आहे.आपण सर्वांनी व्यसनापासून दूर राहून आनंदी जीवन जगूया. इतरांनाही त्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. विशेषतः तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आपल्या देशाला सक्षम बनविणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त जीवन जगण्याबरोबरच नववर्षाचे स्वागत प्रबोधनाच्या माध्यमातून करून आपली संस्कृती जपूया असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी केले.

येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. स्वागत डॉ. आनंदा कुंभार यांनी केले. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.कुराडे म्हणाले, आज नववर्षाच्या स्वागताचे स्वरूप फारच वेगळे होत आहे. त्यातून तरुणाई बिघडत चालली आहे. या तरुणाईला वेळीच शिस्त लावली पाहिजे आणि तरुणाईला वाचविले पाहिजे. नवी पिढी सक्षम राहिली पाहिजे आणि आपल्या देशाचे भविष्य सक्षम केले पाहिजे असे स्पष्ट करून-त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.एन.सी.सी.विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. राहुल मगदूम यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, एन.सी.सी.कॅडेट,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.