गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातर्फे वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री येथील सहवीज प्रकल्पासह विविध प्रकल्पांना भेटी देत अभ्यास दौरा करण्यात आला. हा अभ्यास दौरा द्वितीय व तृतीय वर्ष विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यावेळी अभियंता रणजीत मोरबाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कोल्हापूर येथील इंद्राणी हिट ट्रीटमेंट या प्रकल्पाला भेट देण्यात आली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळ्या उपकरणांची माहिती दिली. दरम्यान, गोकुळ शिरगाव येथील फाईन कास्ट, संजय पॅटर्न वर्क्स अशा विविध आधुनिक प्रकल्पांना भेटी देण्यात आल्या. यावेळी संजय सुतार यांनी मार्गदर्शन केले. अरनी मेकॅनिक प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड येथे भेट दिल्यानंतर दीपक चव्हाण यांनी विविध यंत्रांची व उपकरणांची माहिती दिली.
या अभ्यास दौऱ्याचे नियोजन प्रा. ए.टी.कांबळे, प्रा.डी.डी.पोवार, प्रा.ए.ए.देशपांडे यांनी केले होते. यासाठी प्रा. व्ही.आर.घाटगे व प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

