गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात जीवशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात 'सह्याद्री परिसरातील हत्तींचा वावर' या विषयावर आयआयटी गुवाहाटी येथील पदवीधारक निसर्गतज्ञ रोहित कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते.
स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. किशोर अदाटे यांनी केले. निसर्गतज्ञ रोहित कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये हत्तींचा अधिवास असणे किती गरजेचे आहे. हत्ती व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल, यासह आंबोली, तिलारी परिसरातील निसर्गाचे शोषण या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस. एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. विद्या देशमुख यांनी केले.



