Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावातील सावडाव ग्रुपचा अनोखा 'थर्टीफर्स्ट'


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
विविध कार्यक्रमांना फाटा देत महागाव येथील सावडाव ग्रुपमधील तरुणांनी अनोख्या पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करीत समाजापुढे आदर्श ठेवला. या ग्रुपमधील युवक व आजी -माजी सैनिक संघटनेचे सदस्य यांनी उंबरवाडी येथील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या स्मारकस्थळी तेलाचे दिवे प्रज्वलित करत त्यांना  अभिवादन केले. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

३१ डिसेंबर म्हणजे रात्री डॉल्बी व डिजेच्या तालावर थिरकणे  हे जणू काही समीकरणच बनले आहे. मात्र महागावातील सावडाव ग्रुप याला अपवाद आहे. या चंगळवादी प्रवृत्तीला फाटा देत या ग्रुपमधील सदस्यांनी आजी-माजी सैनिक यांच्या उपस्थितीत उंबरवाडीतील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या स्मारकाच्या चौथऱ्यावर प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. व चौथ्याऱ्यावर पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये तेलाचे दिवे प्रज्वलित करून ठेवले. यामुळे तेथील परिसर उजळून निघाला. रात्री बारा वाजता शहीद जवान चौगुले यांना श्रद्धांजली वाहिली. 

या उपक्रमात महागावातील आजी-माजी सैनिक, शैक्षणिक, व्यवसायिक ,वैद्यकीय,शेती क्षेत्रातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या उपक्रमात डॉ. अंकुश शिंदे, डॉ,अनिल यादव, दिपक जमदाडे, अनिल हलकर्णीकर, संग्राम रजपूत, स्वप्निल शिंदे, शिवाजी शिंदे, राजू मुल्ला, रोहन देसाई, इंद्रजित सुतार,आजी - माजी सैनिक संघटनेचे विजय रेडेकर, बाबुराव इंजल, सर्जेराव देसाई यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.