महागाव, हसुरवाडी,वैरागवाडी, कानोली, गजरगाव, सुळे येथील सरपंच व नूतन ग्रा.पं.सदस्यांचा झाला सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने महागाव, हसुरवाडी,वैरागवाडी, कानोली, गजरगाव, सुळे या गावातील लोकनियुक्त सरपंच व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. माजी सदस्य हणमंतराव पाटील, माजी सभापती विजयराव पाटील तर अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील होते. यावेळी रघुराज पाटील, संस्था प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील, अर्जुन दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. प्रा. बी. एस. मनगुत्ती यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यावेळी प्रा.पी. डी.पाटील, हृदयनाथ सोमशेट्टी, संदीप कोकितकर, प्राचार्य आय. एस. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सोमनाथ पाटील, महागाव सरपंचपदी प्रशांत शिंदे, नूतन सदस्यपदी विकास इंगवले, गौराबाई निकम, हृदयनाथ सोमशेट्टी, वैशाली पाटील, समीना बागवान, संदीप कोकितकर, अनिता रेडेकर, परशुराम हुले, सुरज असवले, हसीना सोलापुरे, हसुरवाडी सरपंचपदी कोमल भोसमोडे, तर नूतन सदस्यपदी जयदीप सरनोबत, शुभांगी पाटील, सुनिता वाघराळकर, अमित कांबळे, जयश्री कल्लोळे, वैरागवाडी सरपंच पदी पी.के.पाटील तर सदस्यपदी मीरा पाटील, उत्तम पाटील, सुनील पाटील, सुनिता पांडुरंग पाटील, सुनिता गणपती पाटील, गजरगाव सरपंचपदी आनंदा कांबळे तर नूतन सदस्य पदी प्रकाश देसाई,भूषण भिंऊगडे,ज्योती गुरव,अनुसया कांबळे, अक्काताई पाटील, महादेव पाटील, कानोली- हरूर ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी सुषमा पाटील तर सदस्यपदी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, सुधीरकुमार पाटील, सारिका भोसले, आरती देसाई, शुभांगी पाटील, तर सुळे सरपंचपदी छाया सूर्यवंशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास फिरोज सोलापुरे, गणपती निकम,अजित आसवले, सचिन कुंभार, मालुताई पताडे, मीना रेडेकर, अशोक भोसले, संजय गडकरी, अक्षय खवरे, संजय दासनहट्टी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी केले. आभार किरण पाटील यांनी मानले.

