Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावात आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन व सैनिक भवनचे उदघाटन


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
महागाव येथे आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन व सैनिक भवनचे उदघाटन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन दत्तात्रय खटावकर होते.

यावेळी बोलताना अप्पी पाटील म्हणाले, महागावच्या सर्वांगीण विकासात आजी-माजी सैनिकांचे मोलाचे योगदान आहे. यापुढील काळात देखील गावच्या विकासासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनी एकत्रित येत गावातील सर्वांनाही सोबत घेत आज येथे सैनिक भवन उभारल्याने गावच्या लौकिकात भर पडली आहे. सर्वांना एकत्र घेऊन सैनिकांनी केलेले समाजाभिमुख काम निश्चितच कौतुकास्पद आहे. 

प्रास्ताविक कॅप्टन महादेव घुगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सैनिक भवनाचे उदघाटन सरपंच प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील तर शहीद जोतिबा चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच संदीप कोकितकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ऑल इंडिया पंच परीक्षा उत्तीर्ण विक्रम नाईक, सावंत प्रा.अभिषेक सुतार, सर्पमित्र संतोष कुंभार आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसहकार संघटनेचे अध्यक्ष आखलाकभाई मुजावर, प्रा.पी.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सागरभाऊ देसाई, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.किरण शहा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत मांगले, गणपती चौगुले, माजी उपसरपंच निवृत्ती मांडेकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, गडहिंग्लज, चंदगड, आजरा येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सदस्य, महागाव पंचक्रोशीतील वीर माता, पिता व वीर पत्नी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्जुन दिवटे व नरसिंह गुरव यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.