गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अकरा विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामार्फत मे 2022 मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पहिल्यांदाच सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे.
यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील गुणवत्ता यादीत अनिता मोरे प्रथम, पुनम कोकितकर पाचवा क्रमांक, मेकॅनिकलमध्ये सायली मांडे दहावा क्रमांक, इलेक्ट्रिकलमध्ये आकांक्षा देसाई प्रथम, सुप्रिया शिगंटे द्वितीय, मोनिका पाटील तृतीय, आरती अर्दाळकर चौथा क्रमांक , शिल्पाज्ञा मोरे पाचवा क्रमांक, अंकुर भोसले सातवा, विशाल पाटील आठवा, हाफिजा शेख हिने नववा क्रमांक पटकावित गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत, प्रा. एस. टी. माटले, प्रा. ए. बी. फराक्टे, प्रा. विनायक घाटगे, डॉ. विरेश मठद यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

