गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी खुर्द येथील जय जवान जय किसान पॅनेलचे नुतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार आजी- माजी सैनिक संघटनेकडून करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लोकनियुक्त सरपंच साधना ऐवाळे, उपसरपंच चंद्रकांत राजे व सदस्य वर्षा गुरव, भारती पाटील, शशिकांत चौगुले, महानंदा कानडे, प्रदीप ऐवाळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भाजपा कार्यकारिणीचे सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह आजी -माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश पाटील, जयसिंग पाटील, दत्तात्रय ऐवाळे, सचिन गुरव, कुमार पाटील, सुरेश कुंभार, बाबुराव पाटील, आनंदा पाटील यासह सैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


