Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या म.फुले विद्यालयात मृदा परीक्षण व दुग्ध भेसळ चाचणी विषयी मार्गदर्शन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव  येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये 'फाली' संस्था अंतर्गत विद्यार्थ्यांना मृदा परीक्षण व दुग्ध भेसळ चाचणी याविषयी कृषीशिक्षक प्रथमेश शेळके यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस. पाटील होते.

यावेळी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील मृदा आणून फाली संस्थेने दिलेल्या किट्सचा वापर करून जमिनीतील वेगवेगळ्या घटकांची माहिती जाणून घेतली. तसेच दुधामधील भेसळयुक्त घटकांची माहिती व ते कसे ओळखले जातात याची माहिती देखील शिक्षक प्रथमेश शेळके यांनी दिली.

यावेळी पर्यवेक्षक अशोक नांदुलकर, भीमराव भुईंबर, सुभाष सुतार, संदेश कोकितकर, एकता पाटील, रमेश कळविकट्टे उपस्थित होते.सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले.आभार सुवर्ण शेवाळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.