गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या प्रोॲक्टिव अबॅकस नॅशनल विभागीय स्पर्धेत UK प्रोॲक्टिव अबॅकस गडहिंग्लजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
UK, प्रोॲक्टिव अबॅकस गडहिंग्लजला १८ ट्रॉफी व ४४ गोल्ड मेडल मिळाले.६ मिनिटास 100 गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेमध्ये 1180 विद्यार्थी सहभागी होते. स्पर्धेच्या युगात कमीतकमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडण घडणीत मोलाची भर पडत असते.
स्पर्धेमध्ये श्रद्धा मगदूम, प्रतिक्षा बंदी, सई देसाई, प्रांजल येळकर यांचा द्वीतीय क्रमांक, साक्षी निर्वाणी, सारंग देसाई, शर्वरी केसरकर, श्रेया बिरंजे, प्रणव शिंदे,सिंचना कोरे यांचा तृतीय क्रमांक तर कनिष्का नाईकवाडी, सृष्टी नाईक, अर्नवराजे नाईक, राहूल आधव उत्तेजनार्थ आणि जान्हवी माने, रुद्र गोकाककर, आदित्य नाईक, रोहीत चिलमी यांचा तृतीय क्रमांक आला. या नॅशनल सर्व विजेत्यांना ट्रॉफी मिळाली व नॅशनल लेव्हल च्या स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच वेदिका वायदंडे, जयवर्धन खन्नुकर, सुयोग मोर्ती, वेदान्त खैरे, शौर्य पाटील, हर्ष खैरे, चैतन्या माने, स्वरांजली पाटील, सर्वेश बडदारे, दुर्वा पाटील, पुर्वी बंदी, सृष्टी कुंभार, अवधुत अमाते, अद्वैन परीट, संस्कृती जांगनुरे, स्वरीत गवळी, अमेय शिंदे, आर्यन कदम, राजनंदनी चव्हान, तन्वी गुरव, प्रणिती देशपांडे, शुभम कांबळे, अबुस्वालेहा जलाली, समर्थ शिंदे, त्रिशा पाटील, अभिषेक यलगच्ची, प्रणित बनसोडे, साईदीप कोरी, सिमराह शेख, तेहनियत शेख, वरद भादवनकर, नयन कुंभार, ऋतिक पाटील, वीर गोकाककर, सुदांशी परीट, वरद डांगट, आर्यन तरवळ, उमेर मुल्ला, अर्णव पाटील, प्रियल कांबळे, मनवा हक्के, नैतिक परीट यांना सुवर्णपदक मिळाले यामुळे सर्वकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. तसेच uk प्रोअक्टीव अबॅकस सेंटरला बेस्ट सेंटर अवॉर्ड मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना सौ.अलमास मुल्ला आणि मोहसीन मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभले.

