Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडास्पर्धत 'शिवराज'चा संदेश कुरळे सुवर्ण व ब्राँझ पदकाचा मानकरी


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलंपिक स्पर्धेत लॉन टेनिस क्रीडा प्रकारात गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या संदेश कुरळे या खेळाडूने सुवर्ण व ब्राँझ पदक असे दोन पदक पटकाविले.

या धवल यशाबद्दल महाविद्यालयात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातील चन्नेकुप्पी सारख्या खेडे गावातील या खेळाडूने आपल्या खेळातून आपली चमक दाखवून आपल्यातील क्रीडा कौशल्याचे संधीत रुपांतर करत तालुक्यासह आपल्या गावचे नावलौकिक केले आहे. संदेशच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संदेशला शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम व प्रा.जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.