Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये पतंग महोत्सव साजरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी काळा व राखाडी रंगाची वेशभूषा परिधान केली होती. सकाळी सहाय्यक शिक्षक शरद कांबळे यांनी मकर संक्रांती बद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. सायंकाळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला. नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पतंग आकाशात सोडले होते. हे दृश्य अत्यंत सुखद होते. सध्याच्या युगात सणामध्ये पारंपारिकपणा कमी होत चालला आहे, मात्र जुन्या चालीरीतीप्रमाणे जुन्या गोष्टी जपत शिवराज इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकांनी मकर संक्रात सण साजरा केला. या उपक्रमाला  मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.