गडहिंग्लज (प्रतिनिधी): बसर्गे बुद्रुक येथील विमा प्रतिनिधी लगमाना महादेव धनगर यांनी 'एलआयसी' च्या गडहिंग्लज शाखेमधून अमेरिकेतील प्रतिष्ठेचा 'एमडीआरटी' हा बहुमान मिळविला आहे. लगमाना हे सर्वात तरुण एमडीआरटी विमा प्रतिनिधी आहेत.एमडीआरटी ही पदवी आयुर्विमा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट जागतिक स्तरावरील अमेरिकेतील (USA) बहुमोल पदवी आहे. अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या या यशाने बसर्गे बुद्रुक गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
लगमाना धनगर हे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी व एजन्सीच्या दुसऱ्याच वर्षी ही जागतिक स्तरावरील पदवी संपादन केली आहे. याकामी त्यांना वरिष्ठ शाखाधिकारी श्री.गायतोंडे, चंदगड शाखाधिकारी श्री.अवचिते,आजरा शाखाधिकारी श्री. गायकवाड, विकास अधिकारी संजीव सोलापूरे, महादेव धनगर यांचे मार्गदर्शन लाभले.


