कुमार पोस्ट येथे कॅप्टन शिवा चौहान प्रत्यक्ष मोहीमांसाठी तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
नवी दिल्ली : फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनवर खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कुमार पोस्ट येथे प्रत्यक्ष मोहिमांसाठी तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
फायर अँड फ्युरी सॅपर्स कोअरच्या संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की "यामुळे भारताच्या नारी शक्तीच्या भावनेचे दर्शन घडून, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल."


