Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या विचारांचे संस्कार : बाळासाहेब कुपेकर

गजरगाव येथे राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महाराष्ट्राची भूमी ही थोर राष्ट्रपुरुष आणि संतांची आहे. देश उभारणीत त्यांचे फार मोठे योगदान असून महापुरुषांच्या विचारांचे संस्कार श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये होत असतात. असे प्रतिपादन सरसेनापती प्रतापराव गुजर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांनी केले.

गजरगाव येथे राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर उदघाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.निवास जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक एन.डी.कांबळे व शिवाजीराव सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी डॉ. निवास जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू,स्थापना, स्वयंसेवकांची कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. दिलीप काळे यांनी केले. श्रमदान शुभारंभ सरपंच आनंदा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच महादेव पाटील, आजरा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, विठ्ठलराव चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, आनंदा गुरव, आनंदराव बाबू गुरव, भूषण भिऊंगडे, नागोजी पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.वैजनाथ सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. मानाजीराव शिंदे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.