कोल्हापूर : पेठवडगाव येथे सौ. तनुजा मुल्लानी व सौ.आशा कवडे यांनी सुरू केलेल्या 'हॉटेल तनुषाज बिर्याणी डायनिंग'चे उदघाटन दिलावर मुजावर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शौमिका महाडीक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
दरम्यान, आमदार राजूबाबा आवळे यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. युवा नेते साहिलभाई मुजावर (मलकापूरकर), वडगाव काँग्रेसचे अध्यक्ष सचिनभाई चव्हाण, राहुल कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





