महापुरुषांच्या शिल्पांसाठी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल केले आभार व्यक्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात महापुरुषांचे शिल्प उभारण्यासाठी आपला अर्धा पगार देऊन सहकार्य केल्याबद्दल डॉ. सुधीर मुंज यांचा सत्कार करण्यात आला.
शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेशाला खास नयनमनोहरी चिर्यांमध्ये आकर्षक असे दोन स्तंभ उभारण्यात आले आहेत. या नयनमनोहरी स्तंभावर कोल्हापूरचे प्रसिध्द शिल्पकार विशाल राजेश कुंभार यांच्या कलेतून साकारलेल्या थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोन महापुरुषांचे शिल्प लावण्यात आले आहेत. हे शिल्प उभारण्यासाठी महाविद्यालयाचे पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज यांनी आपला अर्धा पगार देऊन संस्थेशी आणि आपण कार्यरत असलेल्या महाविद्यालयाशी ऋणानुबंध जपला आहे.
हा ऋणानुबंध सामाजिक भावनेतून आणि आपल्या परीने खारीचा वाटा उचलून आपला सहभाग माणुसकीच्या पातळीवर दृढ़ करण्याच्या उदात्त हेतूने दायित्व जपले आहे. डॉ.मुंज यांच्या सात्विक अशा दायित्वाचा आपणास अभिमान वाटतो. त्यांनी संस्थेशी आपलेपणाच्या भावनेतून सतत जपलेला ऋणानुबंध हा आदर्शवत आहे. असे शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या सामाजीक योगदानाबद्दल आज महाविद्यालयात सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते डॉ.मुंज यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रसिध्द शिल्पकार विशाल कुंभार यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, नॅकचे समन्वयक प्रा.किशोर अदाटे, प्रा.एम.के.नोरेंज,पी.आर.ओ.प्रा.विक्रम शिंदे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.



