पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
प्रवासी वेळीच खाली उतरल्याने सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव : पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी टोलनाक्यानजीक केएसआरटीसीच्या प्रवासी बसला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून बसमधील प्रवासी खाली उतरल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेनंतर यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची यमकनमर्डी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


