Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके विक्रीस मनाई

सार्वजनिक ठिकाणी ३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू

मुंबई : बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणेहस्तांतरण करणेप्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. दि.३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू राहतील.

      

नववर्षानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळागैरसोयधोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.


 या ठिकाणी फटाके वाजविण्यास मनाई

           

दि.३१ जानेवारीपर्यंत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्रबॉटलिंग प्लांट बफर झोनमाहूल टर्मिनल क्षेत्रभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्रहिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्रस्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाकेरॉकेट्स उडवू किंवा फेकू नयेअसे आदेश, उपायुक्त श्री. ठाकूर जारी केले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.