Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीच्या सरपंच दिपाली कांबळे यांचा येणेचवंडीत सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
फुले-आंबेडकर विद्वत सभा पश्‍चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने येणेचवंडी (ता.गडहिंग्लज) येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्य व्याख्यान आणि वंचित बहुजनआघाडीच्या नवनियुक्त महिला सरपंच दिपाली कांबळे यांचा सत्कार फुले-आंबेडकर विद्वत्त सभेचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ.डी.जी चिघळीकर, गोरोबा सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी इतर सदस्यांचाही सत्कार झाला.पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक डी. जी. चिघळीकर यांनी 'भारतीय संविधान आणि ग्रामपंचायत प्रशासन' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. आर. बी. कांबळे, परशुराम कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले.

कार्यक्रमास विनायक कांबळे, किटू कांबळे, आप्पा कांबळे, तानाजी कुराडे, शंकर कांबळे, विश्वास झळके, रविंद्र कुराडे, भिमराव नंदयानावर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कोल्हापूर जिल्हा समन्वयक अभियंता एस.आर. कांबळे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर यानी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.