Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या बुगडीकट्टीच्या चिमुकल्या श्रुतिकाला मदतीची गरज

समाजातील दानशूर, विविध संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील कु. श्रुतिका वसंत नाईक (वय वर्ष ७) ह्या चिमुकलीला वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज असून समाजातील दानशुरानी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.

चिमुकली श्रुतिका ही बुगडीकट्टी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेते. निरागस व नेहमी हसतमुख असणाऱ्या या चिमुकलीला अधून मधून केव्हातरी ताप यायचा त्यामुळे आई- वडील डॉक्टरांकडून तिच्यावर औषध उपचार करावयाचे व ती बरीही व्हायची. मात्र सध्या तिला सततच ताप येत होता, भूकही मंदावली त्यामुळे गडहिंग्लज येथील बालरोग तज्ञांकडे उपचारासाठी तिला नेण्यात आले. यावेळी श्रुतिकाला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

सध्या श्रुतिकावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. पुढील उपचारासाठी तिला जवळपास दहा लाख रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितला आहे. घरची परिस्थिती देखील बेताचीच असल्याने एवढा मोठा खर्च करणे श्रुतिकाच्या आई-वडिलांना अशक्य आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करून आधार देण्याची गरज आहे. निरागस चिमुकल्या श्रुतिकासाठी दानशूर, समाजसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. ज्या व्यक्तींना श्रुतिकासाठी मदत करावयाची आहे त्यांनी 9970024504 (वसंत नाईक) या 'गुगल पे' नंबरवर मदत पाठवावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.