शिवसेनेचे गडहिंग्लज नगरपालिकेला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील पार्किंगचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात यावे व वाहतुकीची कोंडी टाळावी अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने नगरपालिकेकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज नगरपालिकेने प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता अभियानात राज्यात नावलौकिक मिळवला आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांची वेळोवेळी डागडूजी करत रस्ते देखील सुस्थितीत ठेवले आहेत. ही बाब समाधानकारक आहे.
सध्या शहरात लक्ष्मी मंदिर, संकेश्वर रोड, आजरा रोड, भडगाव रोड, काळभैरी रोड, डॉक्टर कॉलनी, नेहरू चौक या ठिकाणी शहरासह तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पार्किंगची समस्या उद्भवत आहे. पार्किंगच्या समस्येमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील रिकाम्या जागेचा उपयोग करावा, पार्किंगला अडथळा करणाऱ्या दुकानदारांना योग्य ती सूचना करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे, अक्षय नावलगी, संभाजी येरुडकर, शुभम बाडकर उपस्थित होते.

