Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गडहिंग्लज शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.

गडहिंग्लज येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात तालुकाप्रमुख दिलीप माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सह संपर्क प्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, संभाजी पाटील, रियाजभाई शमनजी यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

यावेळी उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रतीक क्षीरसागर, वसंत नाईक, प्रकाश रावळ, युवराज पोवार, दिगंबर पाटील, मल्लाप्पा चौगुले, महादेव पाटील, बाळू कुंभार, सुशील विभुते, विलास यमाटे, मारुती कमते, तेजस घेवडे, सिद्धू खवणे, अमर रणदिवे, श्रद्धा शिंत्रे, मंगल जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, भडगाव येथील जनसंपर्क कार्यालयात उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.