गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात बी.सी.एस. विभाग व पदार्थविज्ञान विभाग यांच्या वतीने आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती संपन्न झाली.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. नितीन चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. एस.डी.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.प्रेमला कुरळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याबाबत सविस्तर माहिती देऊन मागर्दर्शन केले. तसेच डॉ. आर.पी.हेंडगे यांनी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, विना अनुदानित विभाग समन्वयक प्रा.आझाद पटेल, पर्यवेक्षक प्रा. टी. व्ही. चौगुले, बी.सी.ए प्रमुख प्रा.के.एस.देसाई, बी.एस्सी संगणक विभाग प्रमुख प्रा. दिपिका खांडेकर-पंडीत यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार डॉ. विजय सावंत यांनी मानले.



