गडहिंग्लज ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात
![]() |
| (छायाचित्रे: मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री पांडुरंग आणि श्री मारुती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित गडहिंग्लज ते पंढरपूर माघवारी पायी दिंडीचे प्रस्थान आज (रविवार) सकाळी करण्यात आले.
सकाळी दिंडीचे प्रस्थान प्रा.सुनील शिंत्रे, अरविंद कित्तुरकर, राजेंद्र तारळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. टाळ मृदंगाचा गजर, हातात भगव्या पताका व विठू नामाचा गजर यामुळे गडहिंग्लज शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. या दिंडीत वारकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सकाळी केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांच्या नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. वारकऱ्यांचा आजचा रात्रीचा मुक्काम महालक्ष्मी मंदिर पट्टणकुडी येथे राहणार आहे.
दिनांक २३ रोजीचा मुक्काम बी.एस.कॉम्प्युजेट कॉलेज बेडकीहाळ, दिनांक २४ रोजीचा मुक्काम श्री विठ्ठल रखुमाई मंदिर नृसिंहवाडी, दिनांक २५ रोजीचा मुक्काम रावसाहेब शंकर दरवंदर फार्म हाऊस मिरज, दिनांक २६ रोजी गणपती मंदिर नरसिंह गाव (लांडगेवाडी), दिनांक २७ रोजी जुनोनी विद्यालय जुनिअर कॉलेज जुनोनी, दिनांक २८ रोजी पू.राजमाता अहिल्यादेवी होळकर नगरपरिषद सांस्कृतिक हॉल सांगोला,
दिनांक २९ रोजी संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी पनवेल- सांगोला रोड पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. या दिंडी सोहळ्यात ह.भ.प शिवाजीराव भुकेले, महेश भादवणकर, जनार्दन सुतार यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे.
![]() |
| (छायाचित्रे: मज्जीद किल्लेदार) |
या दिंडी सोहळ्यासाठी ज्ञानदेव शिंदे, सोमगोंडा देसाई, महादेव पाटील, सदाशिव पाटील, सिद्धार्थ बन्ने, सुरेश पाटील, पांडुरंग पाटील, अरविंद कित्तुरकर, उत्तम देसाई, संजय खोत, राजाराम खटावकर, हिरजी पटेल, अविनाश मडलगी, वसंत शेटके, वसंत पाटील हे परिश्रम घेत आहेत. ही दिंडी दिनांक २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत पंढरपूर मुक्कामी राहणार आहे. दिनांक २ फेब्रुवारी रोजी दिंडीचा परतीचा प्रवास होणार आहे.






