Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

११ बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार

24 जानेवारी रोजी पंतप्रधान या पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

पुरस्कार विजेत्यांमध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश 

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळविणाऱ्या प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, रोख 1 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाणार 


नवी दिल्ली:
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या दिनांक 23 जानेवारी रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या एका समारंभात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या 11 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2023 प्रदान करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी रोजी या राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.

महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी 24 जानेवारी रोजी राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या उपस्थितीत या मुलांशी संवाद साधतील आणि त्यांनी केलेल्या श्रेणींविषयी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतील.

कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा आणि क्रीडा अशा क्षेत्रात  ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना मान्यता मिळणे आवश्यक आहे, अशा बालकांना भारत सरकारतर्फे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) पुरस्कार प्रदान करण्यात येते. 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना, सहा विविध श्रेणींमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) मिळविणाऱ्या प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, 1 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

यावर्षी देशातील सर्व विभागातून निवडलेल्या 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल  पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून कला आणि संस्कृती क्षेत्रात (4), शौर्य (1), नवोन्मेष (2), समाजसेवा (2) अशा  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.