Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एम.आर.हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील  महाराणी राधाबाई (एम.आर.) हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव शुभारंभ निमित्त दिनांक २९ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणी राधाबाई हायस्कूल आजी-माजी विद्यार्थी असोसिएशन मार्फत हा कार्यक्रम होत आहे. यावेळी सकाळी ज्योत स्वागत, शोभायात्रा, उदघाटन सोहळा, माजी विद्यार्थी मनोगते, विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

महाराणी राधाबाई (एम.आर.) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची सुरूवात १०० वर्षापूर्वी म्हणजे दि. २९ जानेवारी १९२३ ला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून करण्यात आली. या १०० वर्षांचे औचित्य साधून महाराणी राधाबाई हायस्कूल आजी-माजी विद्यार्थी असोसिएशन मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

शताब्दी महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी आनंदराव दादा पाटील, आय.ए.एस अधिकारी आप्पासाहेब धुळाज, संजयसिंह चव्हाण, कृषी विभागाचे संचालक विकास पाटील, राजपत्रित अधिकारी संघटना अध्यक्ष विनोद देसाई, मल्लिकार्जून उत्तुरे, खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसिलदार दिनेश पारगे, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ उपस्थित राहणार आहेत.

शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संजय कुंभार, असोसिएशन अध्यक्ष निशिकांत गोरूले, उपाध्यक्ष बाळ उर्फ माधव पोटे-पाटील, सचिव संकेत देसाई, खजिनदार सचिन शहा, सदस्य अशोक देशपांडे, डॉ. सुभाष पाटील, सतीश इटी, राजेंद्र मोळदी, गुरूराज हत्ती, प्रकाश रामपुरे, नरेंद्र भद्रापूर, विश्वनाथ सुतार, प्रविण चव्हाण, उमेश पाटील, मारुती चव्हाण, कार्याध्यक्ष चंद्रकांत गुजर, स्वागताध्यक्ष किशोर हंजी, कार्यवाह डॉ. संकेश्‍वरी, सर्व माजी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी दि. २८ जानेवारी पूर्वी आपली नोंदणी करावी असे आवाहन असोसिएशन मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.