गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अप्पी पाटील गटाचे संदीप कोकितकर यांची बिनविरोध निवड झाली.अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत शिंदे होते. निवडणूक निरीक्षक म्हणून गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी संदिप धनवडे व सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी उपस्थित होते. कोकितकर घराण्याला संदीप कोकितकर यांच्या रुपाने तिसऱ्यांदा उपसरपंच पद मिळाले आहे
उपसरपंच निवडीवेळी संदीप कोकितकर यांनी आपला अर्ज दाखल केला. विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सुरज आसवले, रमेश काबळे, रवी कांबळे, संदिप कोकीतकर यांनी मनोगत व्यक्त केले.
महागाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तिरंगी लढत झाली होती. अप्पी पाटील गटाचे सरपंचांसह दहा सदस्य निवडून आले होते.
यावेळी गोडसाखरचे माजी प.समिती सभापती विजयराव पाटील, गोडसाखरचे संचालक सोमनाथ पाटील, आप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील, ग्रा.पं.सदस्य विकास इंगवले, सुरज आसवले,परशुराम हुले ,गौराबाई निकम, वैशाली पाटील, समिना बागवान, अनिता रेडेकर ,हसीना सोलापुरे, विलास रेडेकर,अख्तर बागवान, सरिता कोले, अन्नपूर्णा सोमशेट्टी, कमल पताडे , फिरोज सोलापुरे उपस्थित होते.

