Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी- तेरणी रस्ता रुंदीकरणाची गरज

अरुंद रस्त्यामुळे अवजड वाहतुकीस अडथळा

साईडपट्टया कमकुवत झाल्याने इतर वाहनांना मार्ग काढणे ठरत आहे अडचणीचे 

ऊस वाहतुकीमुळे एसटी बसेससह इतर अवजड वाहनांना करावे लागते कसरत

वाहन चालकांमध्ये निर्माण होत आहेत वादावादीचे प्रसंग  

 तेरणी : ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनामुळे पाठीमागील वाहने अडकल्याने काल बुधवारी दुपारी वाहन चालकांमध्ये असे वादावादीचे प्रसंग निर्माण झाले.

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
हलकर्णी- तेरणी रस्त्यावर सध्या  ऊस वाहतूक सुरू असल्याने एसटी बसेससह इतर अवजड वाहनांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. अरुंद रस्ता हे याचे मूळ कारण असून रस्ता रुंदीकरणाची नितांत गरज आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास ही समस्याच उद्भवणार नाही.

हलकर्णी- तेरणी मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मध्यंतरी एका खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी साईड पट्ट्यांची खुदाई केली होती. त्यामुळे साईडपट्टया या कमकुवत बनल्या आहेत. केवळ माती टाकूनच हे भराव भरण्यात आल्याने ते खचले आहेत. पावसाळ्यातही या ठिकाणी चिखल रस्त्यावर येऊन वाहने घसरण्याचे प्रकार घडले होते.

सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक या रस्त्यावरून सुरू आहे. ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक सुरू असताना या रस्त्यावर याच दरम्यान एसटी बससह अन्य अवजड वाहने  पाठीमागून येत असल्यास त्या वाहनांना मार्ग काढत पुढे जाणे मोठे अडचणीचे ठरते. परिणामी धीम्यागतीने  वाहन चालवत रुंद असलेल्या ठिकाणी मार्ग काढावा लागतो. परिणामी यामुळे वेळ, डिझेलही खर्ची पडतो. बऱ्याच वेळा या रस्त्यावर वाहन चालकांमध्ये या कारणावरून वादावादीचे प्रसंगीही घडत आहेत. त्यामुळे सर्वांनाच निर्माण होणारी ही समस्या दूर करण्यासाठी हा रस्ता रुंदीकरण करण्याची नितांत गरज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.