Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजीराव माने कॉलेजचा अर्णव बुवा राज्यस्तरीय भावगीत, नाट्यगीत गायन स्पर्धेत प्रथम


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या अर्णव मच्छिंद्र बुवा या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्यावतीने राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायनस्पर्धा २०२३' मध्ये आयोजित करण्यात आले.

माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील, मीनाताई वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या समारंभात डॉ. गिरीश वझे व डॉ. हेमिनी चांदोलकर यांच्या हस्ते रोख वीस हजार, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन अर्णव बुवा याला गौरविण्यात आले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी अर्णवचे अभिनंदन केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य मच्छिंद्र बुवा, पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.