Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात कुलसचिव संतोष शहापूरकर यांचा पी.एच.डी. संपादन केल्याबद्दल सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष शहापूरकर यांनी शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयात पी.एच.डी. संपादन केल्याबद्दल महाविद्यालयात प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात दै.पुढारीचे विभागीय प्रतिनिधी प्रवीण आजगेकर व संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी संतोष शहापूरकर यांचा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे. त्यांनी पी.एच.डी. करून स्वत:ला सिद्ध केले आहे, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे हे कार्य त्यांनी केले आहे असे त्यांनी सांगून शुभेच्छा दिल्या. दै.पुढारीचे विभागीय प्रतिनिधी प्रवीण आजगेकर यांनी संतोष शहापूरकर यांच्या आजपर्यंत खडतर प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही मजल मारली असल्याचे स्पष्ट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ.शहापूरकर यांनी पी.एच.डी.संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सत्कारमूर्ती संतोष शहापूरकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, इंग्लिश मेडीयमच्या मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे, प्रा.आझाद पटेल यांच्यासह यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले.

कुलसचिव संतोष शहापूरकर यांनी “प्रशासकीय व्यवहारातील मराठी भाषेचा अभ्यास' [महाराष्ट्र राज्य उच्च्च व तंत्र शिक्षण संदर्भात] हा प्रबंध सादर केला असून त्यांना या अभ्यासासाठी डॉ.दत्ता पाटील, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांना २४ वर्षे प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य कुलसचिव संघाचे कार्याध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अत्यंत गरिबीतून शिक्षण घेऊन आपल्या खडतर प्रवासात महाविद्यालयाचा कनिष्ठ लिपिक ते कुलसचिव पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुलसचिव संतोष शहापूरकर यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.