हुदली जि.पं. कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचे उदघाटन
हत्तरगी (वार्ताहर): ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाचा विकास झाल्यासारखं होईल या उद्देशाने माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी पंचायतराज व्यवस्था अंमलात आणली. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केपीपीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले.
हुदली ज़ि पं. कार्यक्षेत्रातील कुमरी व रंगडोळी गावातील रस्त्यांसाठी प्रत्येकी 80 लाख रुपये, हुदली गावातील मुख्य रस्त्यासाठी 80 लाख रुपये व शेतवडीत जाणाऱ्या रस्त्यासाठी 40 लाख रुपये, हुदली ते करवीनकुपी क्रॉस रस्ता रुंदीकरणसाठी 5 कोटी रुपये, मुख्यमंत्री योजनेखाली धरनट्टी येथे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाची सुरवात, हुदली गावात 50 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वाल्मिकी सभा भवनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार जारकीहोळी बोलत होते. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्या कोणत्याही समस्या माझ्याकडे केव्हाही घेऊन याव्यात त्या वेळीच मार्गी लावल्या जातील अशी ग्वाही देखील आमदार जारकीहोळी यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास रंगढोळी, कुमरी, करवीनकुपी, धरणट्टी ग्रा.पं. अध्यक्ष,उपाध्याक्ष, सदस्य व नागरिक उपस्थित होते

