गडहिंग्लज(प्रतिनिधी): येथील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात (एमपीएससी) ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण महाविद्यालयाच्या प्राचार्या गंगाली पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी आर.जी.पाटील, खजिनदार एल.जी.पाटील, संचालिका विशाखा पाटील तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

