गडहिंग्लज (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनानिमित्त हसुरचंपू शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण माजी सैनिक सुरेश गोटूरे, विजय पवार, सुरेश तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे संघटक संभाजी येरुडकर, शिवसेना सहप्रमुख राजू गोटरे, चंद्रशेखर खवणे, आनंदा माने, सुरेशराव शेंडगे, भैरु बिरंजे, आप्पासाहेब शिपुरे, शिवाजी खवले, अनिल धामणकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. शालेय मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

