Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.आझाद पटेल यांनी केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे व जिजाऊ महिला ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा सुवर्णलता गोविलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रा.पी.डी.पाटील यांनी समाजात परिवर्तन हे प्रबोधनाच्या माध्यमातून झाले पाहिजे. प्रबोधनातून झालेले परिवर्तन हे नेहमी टिकते. हे परिवर्तन करायचे असेल तर सत्य काय आहे याचा साकल्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. नव्या पिढीलाही सत्य इतिहास कळणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, प्राचार्य कल्याणराव पुजारी, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा सुमन सावंत, उर्मिला कदम, पौर्णिमा कुरुणकर, छाया इंगळे, छाया वडगांवे, गीता पाटील, प्रा.कमलाकर, प्रा.ईश्वर दावणे, प्रा.पट्टणशेट्टी व अन्य मान्यवर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.