गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी खुर्द येथील उपसरपंचपदी आजी- माजी सैनिक संघटनेचे चंद्रकांत राजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याा निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच साधना ऐवाळे होत्या.
ग्रामपंचायत निवडणुकीत आजी- माजी सैनिक संघटना पुरस्कृत जय जवान जय किसान पॅनेलने सरपंच पदासह सहा जागावर विजय मिळवत सत्तांतर केले होते. विरोधी पॅनलला तीन जागा मिळाल्या होत्या.
या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल गंधमवाड यांनी काम पाहिले. यावेळी सेवा सोसायटी चेअरमन शशिकांत चौगुले, सुरेश पाटील, वर्षा गुरव, संजय नाईक, महानंदा कानडे, अनिता साळवी, प्रदीप ऐवाळे, भारती पाटील, सुष्मा कुंभार ग्रामसेवक टी.वाय.हानुमंते यांच्यासह सैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

