गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हसुरसासगिरी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भैरवनाथ मिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप कडुकर होते. उपसरपंच पदासाठी श्री.मिसाळ यांचे नाव सदस्या अनिता कदम यांनी सुचविले. निरीक्षक म्हणून श्री. इंगवले यांनी काम पाहिले.
यावेळी सदस्य प्रकाश कोरे, गायत्री नाईक, आनंद निंबाळकर, अनिता कदम, संगीता कोरे, रेखा कोंडुसकर यांच्यासह भीमराव कडुकर, माजी पोलीस पाटील विरगोंडा देसाई, बलवंत कोरे, दूंडाप्पा कोरे, मारुती कडुकर, जयसिंग जाधव, महेश शिंदे, ग्रामसेवक संजय पाटील उपस्थित होते.

