गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड (आभा) गडहिंग्लज शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने काढून देण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.
आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या कार्डच्या माध्यमातून देशभरातील कोणत्याही दवाखान्यात मोफत उपचार घेता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे हे हेल्थ कार्ड असणे जरुरीचे आहे. तालुक्यातील नागरिकांना हे हेल्थ कार्ड शिवसेनेच्या वतीने काढून देण्यात येणार असून नागरिकांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय पाटणे गल्ली किंवा उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

