Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात श्रीमती रत्नमाला घाळी यांना श्रद्धांजली


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवराज महाविद्यालयात विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या श्रद्धांजली सभेत शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी श्रीमती घाळी वाहिनी या आमच्या संस्थेच्या मार्गदर्शक तसेच आमच्या विद्या संकुलाच्या मातृदेवता होत्या. डॉ.घाळी साहेबांनी व मायमाऊली श्रीमती रत्नमाला घाळी यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी होते. त्यांनी आम्हाला व संस्थेला दिलेली प्रेरणा आम्ही कधीच विसरू शकणार नाही असे सांगून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

संचालक बसवराज आजरी म्हणाले, डॉ.घाळी साहेबांच्या नंतर विद्या प्रसारक मंडळाची तसेच अन्य विविध संस्थांची धुरा श्रीमती घाळी वहिनी यांनी सक्षमपणे सांभाळल्या. त्यांनी अनेक संस्थांना मार्गदर्शन केले आहे असे सांगून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही.चौगुले, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.