Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथे प्रशांत प्रकाश नाईक ( वय वर्ष ३२, मुळगाव हेब्बाळ कसबा नूल, सध्या राहणार तेरणी)  या तरुणाने झाडाच्या फांदीला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद पत्नी लक्ष्मी प्रशांत नाईक यांनी हलकर्णी पोलिसात दिली आहे. या घटनेची नोंद हलकर्णी पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत प्रशांत हा ट्रॅक्टर चालक होता. त्याची सासरवाडी तेरणी असून तो नातेवाईकाच्या लग्नासाठी तेरणी येथे मंगळवारी आला होता. प्रशांत याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत बुधवारी सकाळी साडेसहाच्या पूर्वी घरासमोरील उमाप्पा कांबळे व पुंडलिक कांबळे यांच्या जमिनीच्या बांधावरील झाडाच्या फांदीला प्रशांत याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याची वर्दी पत्नी लक्ष्मी नाईक यांनी पोलिसात दिली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.