Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंग्लंड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल विशाखा कुराडे यांचा सत्कार

                                     (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
 इंग्लंडच्या स्वॅन्सी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीतून निवड झाल्याबद्दल शिवराजची माजी विद्यार्थिनी विशाखा अनिलराव कुराडे यांचा सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी  जिल्हा परिषद सदस्य ॲड.हेमंत कोलेकर व सौ.अर्चना कोलेकर, 'गोडसाखर'च्या माजी संचालिका सौ.क्रांतीदेवी कुराडे यांची उपस्थिती लाभली.

प्रारंभी स्वागत पर्यवेक्षक प्रा. टी. व्ही. चौगुले यांनी केले. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात विशाखा अनिलराव कुराडे यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन ॲड. हेमंत कोलेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ॲड. कोलेकर म्हणाले, नव्या पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून जे-जे काही चांगले घेता येईल यासाठी आग्रही राहिले पाहिजे. पुढारलेल्या देशात ही संधी मिळणे म्हणजे फार मोठी संधी आहे. ही संधी विशाखा कुराडे यांना मिळाली आहे. परदेशी विद्यापीठातील शिक्षणातील कौशल्य आत्मसात करण्यासाठी कु.विशाखा सक्षम आहे. हे ग्रामीण विद्यार्थ्यांना हा आदर्श ठरावा असे कार्य विशाखा कुराडे यांनी केले आहे असे स्पष्ट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ग्रामीण समाजाशी शिवराजने ऋणानुबंध जपले आहे. शिवराजच्या शिक्षणाची व्याप्ती जगभर गेली पाहिजे. कु.विशाखाच्या इंग्लंडमधील शिक्षणाचा उपयोग शिवराजच्या विद्यार्थ्यांना व्हावा हा उद्दात्त हेतू सफल व्हावा. यासाठी कु.विशाखाने खूप मेहनत घ्यावी म्हणजे या भागातील विद्यार्थ्यांना शिवराजच्या माध्यमातून नवीन शिक्षणाची पर्वणी प्राप्त होईल असे स्पष्ट करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. कॅनरा बँकेचे शाखाधिकारी आदित्यकुमार सपकाळे यांनी कॅनरा बँकेच्या माध्यमातून परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी गोडसाखरच्या माजी संचालिका सौ.क्रांतीदेवी कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, ॲड. सतीश इटी, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, राजगोंड पाटील, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा.विक्रम शिंदे, प्रा.एम.के.नोरेंज आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विशाखा कुराडे यांनी या शिक्षणासाठी कोण-कोणत्या परीक्षा व मुलाखती द्याव्या लागतात याची प्रक्रिया कशी आहे. त्यातून आपणाला कशी संधी मिळते त्यासाठी आपल्यातील क्षमता सिद्ध कराव्या लागतात याची माहिती दिली. आपण मेडिकल रेडीएशनमधून उच्च शिक्षण घेण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

                            (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

या कार्यक्रमात मराठा मंडळ गडहिंग्लज, महाविद्यालयाच्या फिजिक्स, फार्मसी कॉलेज व अन्य विविध विभागाच्यावतीने कु.विशाखा कुराडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, मराठा मंडळाचे पदाधिकारी सुधीर उर्फ आप्पा शिवणे, प्रा.शिवाजीराव भुकेले, संजय पाटील, पी.जी.पोवार, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्या संकुलातील सर्व स्टाफ, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. प्रियांका जाधव, प्रा.गीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.आशा पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.