Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील चित्रपटगृहांमध्ये 'पठाण' प्रदर्शित झाल्यास शिवसेनेकडून आंदोलन

शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांचा इशारा 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
हिंदूंच्या भावना दुखावणारा 'पठाण' चित्रपट गडहिंग्लजमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) पत्रकातून दिला आहे. सदर पत्रक उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, पठाण चित्रपट हा या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता यामध्ये वादग्रस्त दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटाला अनेक ठिकाणी विविध हिंदू संघटनांनी विरोध केल्याने चित्रपटातील काही दृश्यांमध्ये बदल करून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा वादग्रस्त चित्रपट गडहिंग्लज मधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

या पत्रकात उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, गिरीश मडलगी, शकील मुल्ला, संदीप कुराडे यांच्यासह इतर शिवसैनिकांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.