Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन' फार्मसीत प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा 'इंडक्शन प्रोग्राम'

चिंचेवाडी : संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात आयोजित 'इंडक्शन प्रोग्राम'मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी.जी.गुणे.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
चिंचेवाडी साईट येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थ्यांचा 'इंडक्शन प्रोग्राम' नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. जी. गुणे (व्यवस्थापकीय संचालक, एस.जी. फिटो फार्म प्रा. लिमिटेड) यांची उपस्थिती होती.  

यावेळी श्री. गुणे यानी सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीत वावरताना संतुलित आहार, आयुर्वेदीक औषधे यांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगत सध्या उपलब्ध वनौषधी संशोधनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ.एस.जी.किल्लेदार यांनी प्रास्ताविकेत कॉलेजमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, फार्मसी क्षेत्रातील देश तसेच विदेशातील नोकरीच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा.अभिनंदन आलमान यांनी सर्व विद्यार्थी-पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रम पद्धती, परीक्षेचा पॅटर्न आणि कॉलेजचे आणि विद्यापीठाचे नियम याबाबत माहिती दिली. तसेच कॉलेजचे परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.मच्छींद्र होलम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल हराळे, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. कैवल्य मिरजकर, अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा.सुमित जोशी यांनी कॉलेजमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, प्राचार्य डॉ.ए.एम.पटेल, प्रा.डी.बी.केस्ती यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती करांडे यांनी केले. प्रा.कैवल्य मिरजकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.