Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनो, सर्वसामान्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा द्या!

ॲड. बाळासाहेब चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

संत गजानन रुरल पॅरामेडिकल कॉलेजचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न

महागाव : पारितोषिक वितरण करताना ॲड. बाळासाहेब चव्हाण. यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, पत्रकार प्रकाश चौगुले, ना.शि.घोलप.

गडहिंग्लज (प्रतिनिधी): ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी सामानगडच्या पायथ्याशी लावलेल्या संत गजानन शिक्षण समूहाच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शिक्षणाच्या वेगवेगळ्या विभागाच्या अभ्यासक्रमातून अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. रुरल पॅरामेडिकल कॉलेजची १९९७ साली स्थापना झाली. या कॉलेजमधून शिक्षण घेऊन परदेशात ११ पेक्षा जास्त तर देशातील सात राज्यात पंधराशे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनो, वैद्यकीय क्षेत्रात सेवा म्हणून काम करून सर्वसामान्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा द्या व कॉलेजचा नावलौकिक वाढवा असे आवाहन संत गजानन शिक्षण समूहाचे सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी केले.

महागाव येथील संत गजानन रुरल पॅरामेडिकल कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते  बोलत होते. यावेळी श्री. शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य ना. शि. घोलप, रमेश भोसले, 'दै. तरुण भारत संवाद'चे पत्रकार प्रकाश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर यांनी केले. कार्यक्रमात कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, धावणे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी  विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत आपला कलाविष्कार दाखवला. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा.विनय काईंगडे, अजित भुईंबर, प्रा. पूनम कुंभार आदींनी परिश्रम घेतले.

या कार्याक्रमास संस्था अध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांचे प्रोत्साहन व विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. सतीश बंदी यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रा.भाऊसाहेब आवळेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.