Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमधील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले मार्गदर्शन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश पारगे, अप्पर तहसीलदार श्रीमती श्रद्धा उदावंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्था सेक्रेटरी आर. जी. पाटील होते. यावेळी संचालक एल.जी. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या गंगाली पाटील उपस्थित होते.

स्वागत प्राचार्या गंगाली पाटील यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले. यावेळी तहसीलदार  दिनेश पारगे यांनी नव मतदारांनी मतदार नोंदणी कशी करावी, मतदानाची प्रक्रिया, लोकशाही व मतदान याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीमती श्रद्धा उदावंत यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दृष्टीकोन कसा ठेवावा याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये रांगोळी  स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किर्तीदेवी सावंत यांनी केले व आभार प्रा. शुभांगी शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.