Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधात गडहिंग्लजमध्ये हिंदू बांधव रस्त्यावर


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतरण विरोधात गडहिंग्लजमध्ये हिंदू जनसंघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महिलांची संख्या लक्षणीय होती. या मोर्चेमुळे गडहिंग्लज शहर भगवेमय झाले होते.

म. दु. श्रेष्ठी विद्यालय येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा आणण्यात आला. जय श्रीराम, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणा देत हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यानंतर विराट सभा घेण्यात आली. या सभेला हिंदू संघटनांच्या मान्यवरांनी संबोधित केले.

सध्या देशात लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतरण आदी प्रकार वाढले आहेत. यांना आळा घालण्यासाठी कायदे करण्यात यावेत याकडे हिंदू संघटनांनी लक्ष वेधले. पारंपारिक वाद्याच्या गजरात हिंदू बांधवांनी डोक्यावर भगव्या टोप्या व हातात भगवे ध्वज घेऊन जनजागृती केली. या जनसंघर्ष मोर्चामुळे  गडहिंग्लज शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.